Breaking News

बाप माणसालाही हवीय 'पितृत्व रजा'! : N7 News Voice

बाप माणसालाही हवीय 'पितृत्व रजा'!  मुलाच्या संगोपनात वडिलांची भूमिका महत्त्वाचीकाय सांगतो जागतिक कल?

नागपूर : आईच्या गरोदरपणापासून ते बाळाच्या जन्मानंतरच्या सुरुवातीच्या काळापर्यंत आईची भूमिका सर्वश्रेष्ठ असतेचपण या प्रवासात वडिलांचे (बापाचे) स्थानही तितकेच महत्त्वाचे आहे. भारतात सरकारी नोकरीत महिलांना सहा महिन्यांची 'मॅटर्निटी लीव्ह' (Maternity Leave) मिळतेमात्र पुरुषांना मिळणारी 'पॅटर्निटी लीव्ह' (Paternity Leave) आजही केवळ नावालाच आहे. मुलाचे संगोपन अधिक चांगले व्हावे आणि कुटुंबातील जबाबदाऱ्यांचे समतोल वाटप व्हावेयासाठी आता वडिलांनाही दीर्घकाळ सुटी मिळण्याची मागणी जोर धरत आहे.  

No comments